विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥ अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥२॥ तो चि शरणांगतां विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि । लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥ विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख । गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥
Writer(s): Tukaram Sant, Mohile Anil, Khale Shrinivas<br>Lyrics powered by www.musixmatch.com