
Guppa Goshti 25 - वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजे २१ जुन/ Summer solstice
Episode · 0 Play
Episode · 3:14 · Jun 21, 2024
About
Guppa Goshti 25 - वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजे २१ जुन/ Summer solstice आज 21 जून…जगभरात आजचा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे. आजपासून दक्षिणायनाला प्रारंभ होणार आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस ओळखला जातो. या खगोलीय घटनेला Summer Solstice म्हणून ओळखले जाते. समर सॉलस्टाईस ही एक खगोलीय घटना आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. 21 जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. तो दिवस मोठा दिवस म्हणून ओळखला जातो. जगातल्या अनेक देशांमध्ये हा दिवस 12 तासांपेक्षाही मोठा असतो.
3m 14s · Jun 21, 2024
© 2024 Podcaster