Vithala Samacharan Tujhe Dharite Lyrics
विठ्ठला, समचरण तुझे धरिते
रूप सांवळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते
नेत्रकमल तव नित् फुललेले
प्रेममरंदे किती भरलेले
तव गुण-गुंजी घालीत रुंजी
मानस-भ्रमरी फिरते
अरुण-चंद्र हे जिथे उगवती
प्रसन्न तव त्या अधरावरती
होऊन राधा माझी प्रीति
अमृतमंथन करिते
जनी लाडकी नामयाची
गुंफुन माला प्राणफुलांची