Sang Tu Majhach Na

Sang Tu Majhach Na Lyrics

Dhakti Sun  by Asha Bhosle

Song  ·  110,581 Plays  ·  4:33  ·  Marathi

© 2020 Ishtar Music Pvt. Ltd.

Sang Tu Majhach Na Lyrics

सांग तू माझाच ना?
सांग तू माझाच ना?
राहू कशी तुझियाविना?
सांग तू माझाच ना?
सांग तू माझाच ना?

चालता वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
चालता वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
प्रीतीच्या वळणावरी मी थांबले, गुंतले

भासते उतरून खाली
स्वर्ग ये जणू पाहुणा
सांग तू माझाच ना?
सांग तू माझाच ना?

भेट होता एक झाले मी नवी, जगही नवे
भेट होता एक झाले मी नवी, जगही नवे
वाटते, आले जुळूनी जन्म-जन्मींचे दुवे

जीवना लाभे किनारा
स्वप्न लाभे लोचना
सांग तू माझाच ना?
सांग तू माझाच ना?

हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडिले ते ना कधी तोडायचे
हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडिले ते ना कधी तोडायचे

दूर नाही जायचे
स्वप्नातही, मनमोहना
सांग तू माझाच ना?
राहू कशी तुझियाविना?

सांग तू माझाच ना?
सांग तू माझाच ना?

Writer(s): Sudhir Moghe, Sudhir V Phadke<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Dhakti Sun

Loading

You Might Like

Loading


4m 33s  ·  Marathi

© 2020 Ishtar Music Pvt. Ltd.

FAQs for Sang Tu Majhach Na