Sairbhar Jhala Sara

Sairbhar Jhala Sara Lyrics

Diwas Ase Ki  by Shailesh Ranade

Song  ·  11,587 Plays  ·  5:24  ·  Marathi

© 2020 Fountain Music Company

Sairbhar Jhala Sara Lyrics

सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ
सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ
अंधारल्या पिंपळाला लागले का खूळ?
सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ

दिशा साऱ्या सुन्या-सुन्या, कुणी नाही, कुणी नाही
पारावर वेडा एक, त्याला सुद्धा कोणी नाही
दिशा साऱ्या सुन्या-सुन्या, कुणी नाही, कुणी नाही
पारावर वेडा एक, त्याला सुद्धा कुणी नाही

असायला कुणी नाही, नसायला कुणी नाही
भले-बुरे काहीतरी, बोलायला कुणी नाही
असायला कुणी नाही, नसायला कुणी नाही
भले-बुरे काहीतरी, बोलायला कुणी नाही

कुणी नाही, कुणी नाही, कसलीच गाज नाही
पारातल्या पणतीला विझण्याची लाज नाही
कुणी नाही, कुणी नाही, कसलीच गाज नाही
पारातल्या पणतीला विझण्याची लाज नाही

तिमीरच्या पायी मग वाजू लगे चाळ
तिमीरच्या पायी मग वाजू लगे चाळ
सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ

एक-एक आला-गेला आणि ठेवला पसारा
सुर-सूर जोडताना जाहलाच केर सारा
एक-एक आला-गेला आणि ठेवला पसारा
सुर-सूर जोडताना जाहलाच केर सारा

दिसभर खेळायला, मी गं रांधलेली चूल
आता तिमीरात कशी मला मीच द्यावी भूल?
दिसभर खेळायला, मी गं रांधलेली चूल
आता तिमीरात कशी मला मीच द्यावी भूल?

एक-एक श्वास आता तूटनार थोडा-थोडा
उद्या इथे पारावर असेल का हाच वेडा?
एक-एक श्वास आता तूटनार थोडा-थोडा
उद्या इथे पारावर असेल का हाच वेडा?

वेडातच रात गेली, वेडात सकाळ
वेडातच रात गेली, वेडात सकाळ
सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ

किड्या पाठोपाठ किडे, लागे पिंपळाशी रीघ
क्षण पळताचस दिन जमे कचऱ्याचा ढीग
किड्या पाठोपाठ किडे, लागे पिंपळाशी रीघ
क्षण पळतास दिन जमे कचऱ्याचा ढीग

कचऱ्याला मोल नाही, कुणी कसे खोल नाही
कसे हात जुळतील, समईत तेल नाही
कचऱ्याला मोल नाही, कुणी कसे खोल नाही
कसे हात जुळतील, समईत तेल नाही

पिंपळाच्या पानातून तीच जुनी सळसळ
पान-पान जपण्याचा तोच जुना-जुना चळ
पिंपळाच्या पानातून तीच जुनी सळसळ
पान-पान जपण्याचा तोच जुना-जुना चळ

धिसळतो पार सारा, धिसाळते मूळ
धिसळतो पार सारा, धिसाळते मूळ
सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ
सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ

अंधारल्या पिंपळाला लागले का खूळ?
सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ
सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ
सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ

Writer(s): Sandeep Khare<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Diwas Ase Ki

Loading

You Might Like

Loading


5m 24s  ·  Marathi

© 2020 Fountain Music Company

FAQs for Sairbhar Jhala Sara