Rama Raghunandana Lyrics
रामा रघुनंदना, रामा रघुनंदना
आश्रमात या कधी रे येशिल
आश्रमात या कधी रे येशिल, रामा रघुनंदना
रामा रघुनंदना, रामा रघुनंदना
मी न अहल्या शापित नारी
मी न अहल्या शापित नारी
मी न जानकी राजकुमारी
मी न जानकी राजकुमारी
दीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी
तुझ्या पदांचे अखंड चिंतन
तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना
रामा रघुनंदना, रामा रघुनंदना
पति तपावना, श्री रघुनाथा
एकदाच ये जाता-जाता
पाहिन, पूजिन, टेकिन माथा
पाहिन, पूजिन, टेकिन माथा
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल
तोच स्वर्ग मज, तिथेच येईल, पुरेपणा जीवना
रामा रघुनंदना, रामा रघुनंदना
Writer(s): Dutta Davjekar, G D Madgulkar<br>Lyrics powered by www.musixmatch.com
More from Marathi Chitrapatil Gajaleli Bhakti Geet
Loading
You Might Like
Loading
3m 10s · Marathi