Rakhumaai Lyrics

तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालं ना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलं ना
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालं ना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलं ना

ये गं, ये गं रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी
ये गं, ये गं रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी

तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालं ना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलं ना

तू सकलांची आई, साताजन्माची पुण्याई
घेई पदरात, आम्हावरी छाया धर, बाई

तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान
देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई

रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई
रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई
रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई
रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई

तू कृपेचा कळस, आम्ही पायरीचे दास
तरी युगे-युगे उपेक्षाच केली तुझी, बाई

तू मायेचा सागर, आम्ही उपडी घागर
आता करू दे जागर, होऊ दे गं उतराई

रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई
रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई
रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई
रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई

रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई
रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई

Writer(s): Amit Raj, Vaibhav Joshi<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Poshter Girl

Loading

You Might Like

Loading


FAQs for Rakhumaai