Kombadi Palali Lyrics
Jatra by Vaishali Samant, Anand Shinde
Song · 3,103,321 Plays · 5:05 · Marathi
Kombadi Palali Lyrics
हा भार सोसना जड झालाय पिकावानी
अंगात ज्वार भरलं तुझ्या पिरतिच पाज पाणी
हे, घुमुजी राव माझा, सांगा होणार का धनी
रातीला झोप नाही, दावी लाव्तीया पापणी
चांद तो पुनवाचा, तु गं रूपानं गोजिर वाणी
जीव माझा जळतोया, होत काळजाचं पाणी-पाणी
आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली
आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली
आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली
आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली
पोरं होते मी जवान झाले, ऐन ज्वानीत बहरून आले
हि सुगंधी, धुंद काया भेट देते तुला
मावळा मी मर्द गडी गं, हि मिठीची हीच घडी गं
दे ईशारा, इश्क़ सारा येना माझ्या फुला
ए, तुरू-तुरू, तुरू-तुरू चालू नको
गुलू-गुलू, गुलू-गुलू बोलू नको
टक-मक, टक-मक पाहू नको
सोडून साथ कधी जाऊ नको
पिरमाची story, चल शेतात जाऊ राणी
अन् वाटात सूर भिडलं, चल गाऊया गावरान गाणी
ए, कोंबडी पळाली, इथ भर उडाली, फड-फड व्हयाला लागली
आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली
आ-हा, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली
आ-रं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली
जीव माझा तुझ्यात जडला, श्वासो श्वासात रुतून पडला
साथ देते सात जन्मी, प्रीती देईन तुला
या जीवाची झाली दैना, रातीला मला झोपच येईना
मी तुझा गं झालो मजनू, इश्क़ झाला मला
ए, दिला सबूत आता मोडू नको
मन माझं भोळ सखे तोडू नको
बोकडी माग फिरू नको
घराची कौलं फोडू नको
तुझी-माझी जोडी जमली सुरु झालीया नवी कहाणी
तु माझा फुल राजा, मी तुझी सखी फुल राणी
आ-गं, कोंबडी, कोंबडी, कोंबडी, कोंबडी..., —लागली
आ-गं, कोंबडी, कोंबडी, कोंबडी, कोंबडी..., —लागली
आ-हा, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली
आ-गं, कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली
Writer(s): Ajay-atul, Jitendra Joshi<br>Lyrics powered by www.musixmatch.com
More from Jatra
Loading
You Might Like
Loading
5m 5s · Marathi