Jejurichya Khanderaya

Jejurichya Khanderaya Lyrics

Jejurichya Khanderaya  by Devdatta Sable, Shahir Sable

Song  ·  19,077 Plays  ·  4:22  ·  Marathi

© 2001 Ishtar Music Pvt. Ltd.

Jejurichya Khanderaya Lyrics

जेजुरीसम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी
अन् तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी, गडावरी
यळकोट यळकोट जय मल्हार

जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
(जेजुरीच्या खंडेराया जागराला या या)
ए, वाईच्या तू गणराया जागराला या या
(वाईच्या तू गणराया जागराला या या)
अहो, पसरणीच्या भैरी देवा जागराला या या
(पसरणीच्या भैरी देवा जागराला या या)

जेजुरगडा वाजे चौघडा, वाजे चौघडा
पुणं धरती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं
(पुणं धरती ही पलिकडं, गड जेजुरी अलिकडं)

रूप दावून बानू गेली, स्वारी देवाची येडी झाली
(रूप दावून बानू गेली, स्वारी देवाची येडी झाली)
अहो, बानूबाईचं येड लागलं, मल्हारी देव मल्हारी
(बानूबाईचं येड लागलं, मल्हारी देव मल्हारी)

आवं, इसरून गेलंय कुण्या गावाला भंडारी देव भंडारी
(इसरून गेलंय कुण्या गावाला भंडारी देव भंडारी)
आवं येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती
(येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती)

आवं नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडिला खडकाला
(नवलाख पायरी गडाला हो, चिरा जोडिला खडकाला)
आवं बोला हो तुम्ही बोला (बोला हो तुम्ही बोला)
म्हाळसा नारीला (म्हाळसा नारीला)
अन् भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला
(भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला)

अवं मल्हारी मल्हारी, माझा कैवारी देव मल्हारी
(मल्हारी मल्हारी, माझा कैवारी देव मल्हारी)
अवं गळा घालितो भंडारी देव मल्हारी
(गळा घालितो भंडारी देव मल्हारी)

(मल्हारी मार्तंड जय मल्हार)
(मल्हारी मार्तंड जय मल्हार)
(मल्हारी मार्तंड जय मल्हार)
(मल्हारी मार्तंड जय मल्हार)

रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)
बानू नार आणली घरी, मल्हारी रुसला का मजवरी जी?
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)

लखलख दिवट्या जळती पाजळली दीपमाळ, पाजळली दीपमाळ
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)

कडेकपारी त्रिशूळ द्वारी वर उधळे भंडार, उधळे भंडार
नाथ निरंजन सद्गुरू स्वामी घेतलासे अवतार
घेतलासे अवतार देवा लोटलासे भंडार
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)

(मल्हार धनी, मी म्हाळसा राणी)
(कर जोडुनी लागतो चरणी)
(मल्हार धनी, मी म्हाळसा राणी)
(कर जोडुनी लागतो चरणी)
प्रीत नको तुजवरी, प्रीत नको तुजवरी, प्रीत नको तुजवरी

(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)
(रुसला का मजवरी मल्हारी? रुसला का मजवरी जी?)

Writer(s): Madhurkar Pathak<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Jejurichya Khanderaya

Loading

You Might Like

Loading


4m 22s  ·  Marathi

© 2001 Ishtar Music Pvt. Ltd.

FAQs for Jejurichya Khanderaya