Eka Talyat Hoti

Eka Talyat Hoti Lyrics

Nach Re Mora  by Smita Tanavde

Song  ·  4,751 Plays  ·  4:16  ·  Marathi

© 2019 Fountain Music Company

Eka Talyat Hoti Lyrics

मुलांचे मन निष्पाक जणू एखादी कोरी पाटी
आपण दाखवू त्या दिशेने प्रवास करणारी
त्यामुळे त्यांच्यात एखाद्या वेळी
आत्मविश्वास यायला वेळ लागेल कदाचित
पण न्यूनगंड मात्र चटकं निर्माण होतो

तू वेडा आहेस, तू नालायक आहेस
असं वारंवार कानावर आल्यावर
खरंच त्या माणसाला आपण नालायक आहोत
असं वाटायला लागतं

नेमकं तसचं तळ्यातल्या बदकामध्ये
वेगळ्या दिसणाऱ्या बदकाला तू कुरूप आहेस
असं सारकडी वसल्यावर त्यालाही त्याचं
राजहंस पण विसरायला होतं

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे

दावूनी बोट त्याला...
दावूनी बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
सांगेल ते कुणाशी

जे ते त्यास टोची, दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले

पाण्यात पाहताना...
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

Writer(s): Pramod Ghesas<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Nach Re Mora

Loading

You Might Like

Loading


4m 16s  ·  Marathi

© 2019 Fountain Music Company

FAQs for Eka Talyat Hoti