Shrirama Ghanshyama Lyrics

Rama Raghunandana  by Lata Mangeshkar

Song   ·  14,440 Plays  ·  3:11  ·  Marathi

© 2017 Saregama

Shrirama Ghanshyama Lyrics

श्रीरामा, घनश्यामा, बघशिल कधि तू रे?
तुझी लवांकुश बाळे

वनवासाच्या घरात माझ्या अरुण-चंद्र हे सवे जन्मता
विरह प्रीतिचे दु: खही माझे हसले रघुनाथा
विश्वाची मी मंगल माता तुझी लाडकी सीता
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले

रूप मनोहर तुझी पाहिली यौवनातली कांती
बाळांच्या या रूपे बघते तुझ्याच चिमण्या मूर्ति
पूर्ण पाहिले तुला राघवा तरि ही दैवगती
तुझे बालपण तुझ्यापरी का वनवासी झाले

बघायचे जर नसेल मजला ये ना बाळांसाठी
चार करांचा कोमल विळखा पडु दे श्यामलकंठी
ताटातुटीच्या भेटी घडता झरझर अमृत ओठीं
मिटुनी डोळे म्हणेन माझे रामायण संपले

Lyrics powered by www.musixmatch.com